बीड: बीड शहरात २ आणि अंबाजोगाई शहरातील १ संबंधित परिसरातील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही असे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.
बीड शहरातील संत तुकाराम नगर व तुळजाईनगर आणि अंबाजोगई शहरातील सिराज कॉलनी या भागात संबंधित परिसरातील कन्टेन्मेंट झोन शिथील करण्यात आले आहे.