छत्रपती संभाजीनगर: येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील सचिन बाबुराव विठोरे (वय 35 वर्षे, पद-भूमापक), व किरण काळुबा नागरे (वय 43 वर्षे, पद भूमापक) या दोघांना मोजणीचा नकाशा देण्यासाठी तक्रारदाराकडून 60 हजार रुपये लाच घेताना मंगळवारी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचे पिसादेवी रोड येथील प्लॉटचे सरकारी मोजणीसाठी दिलेल्या अर्जावर मोजणी केल्यानंतर केलेल्या मोजणीचा नकाशा तक्रारदार यांना देण्यासाठी भूमापक सचिन बाबुराव विठोरे व किरण काळुबा नागरे या दोघांनी पंचासमक्ष रुपये 1,10,000/- रुपये मागणी केली. सदर पडताळणी होण्यापूर्वी नमूद आरोपींनी तक्रारदार यांचेकडून 50,000/- रुपये हप्ता यापूर्वीच परस्पर स्वीकारलेला असून उर्वरित रक्कम रुपये 60000/- मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष यातील आरोपी क्रमांक 2 यांचे समक्ष आरोपी क्रमांक 1 यांनी दोघांचे मिळून लाच रक्कम स्वीकारली असता दोघाना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीस ठाणे सिडको येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सापळा अधिकारी हनुमंत वारे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद, सहाय्यक सापळा अधिकारी नंदकिशोर क्षीरसागर, पोलीस निरीक्षक ला. प्र.वि. औरंगाबाद, सापळा पथक पोअं तोडकर, नागरगोजे, पाठक, आघाव यांच्या पथकाने केली. त्यांना संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद, राजीव तळेकर, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद यांनी मार्गदर्शन केले.