# औरंगाबादेतील मिनी घाटीतून 22 जणांना डिस्चार्ज; आजपर्यंत जिल्ह्यातील 52 जण कोरोनामुक्त, सध्या 508 कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबादच्या चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून 22 कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर ते आज कोरोनामुक्त झाले. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत 52 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले. दरम्यान, आज नव्याने 30 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 508 झाली.

आज वाढलेल्या कोरोनाबाधितांमध्ये (कंसात रुग्ण संख्या):
संजयनगर, मुकुंदवाडी (6), कटकट गेट (2), बाबर कॉलनी (4), आसेफीया कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), रामनगर-मुकुंदवाडी (1), भवानीनगर, जुना मोंढा (2) सातारा परिसर (1) पानचक्की (1) आणि जुना बाजार (1), पुंडलिक नगर (9) आणि गंगापूर (1) या परिसरातील रुग्ण आहेत. यामध्ये 15 पुरूष आणि 15 महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित 508 रुग्णांमध्ये 311 पुरूष, 197 महिला आहेत.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये (कंसात कोरोनामुक्त झालेले रुग्ण):
बागवान मस्जिद(5), नूर कॉलनी (6), किलेअर्क (3), भीमनगर(1), चेलीपुरा (1), छोटी मंडी, दौलताबाद (1), समता नगर (2), बडा टाकिया मस्जिद (1), सातारा परिसर (1), जलाल कॉलनी (1) या परिसरातील व्यक्तींचा समावेश असल्याचे रूग्णालयाने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *