# पुणे विभागात आज 1157 रूग्णांची वाढ; एकूण 25,127 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 15 हजार 95 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 25 हजार 127 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 9 हजार 19 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 487 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 20 हजार 577 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 11 हजार 942 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 937 आहे. कोरोनाबाधित एकूण 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 356 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.04 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.39 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 157 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 990, सातारा जिल्ह्यात 57, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 09 तर कोल्हापूर जिल्ह्यात 17 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 974 रुग्ण असून 711 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 221 आहे. कोरोनाबाधित एकूण 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 434 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 515 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 666 आहे. कोरोनाबाधित एकूण 253 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 328 रुग्ण असून 214 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 104 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 814 कोरोनाबाधित रुग्ण असून 713 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 91 आहे. कोरोनाबाधित एकूण 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *