पुणे: पुणे विभागातील 837 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
विभागात 2 हजार 885 बाधित रुग्ण असून 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्ह्यात 2 हजार 537 बाधित रुग्ण असून 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 762 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 634 आहे. तर 86 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यात 114 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 98 आहे. सोलापूर जिल्ह्यात 182 बाधित रुग्ण असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 141 आहे. सांगली जिल्ह्यात 37 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 26 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 15 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 6 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. आजपर्यंत विभागात एकूण 29 हजार 319 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 हजार 795चा अहवाल प्राप्त झाला आहे. 1 हजार 524 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 24 हजार 930 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 885 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
आजपर्यंत विभागात 85 लाख 23 हजार 712 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 46 लाख 46 हजार 506 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 74 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.