पुणे: पुणे विभागातील 1 हजार 697 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 849 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 949 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 203 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 127 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 94, सोलापूर जिल्ह्यात 9, सातारा जिल्ह्यात 1 तर व कोल्हापूर जिल्ह्यात 3 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 3 हजार 352 बाधित रुग्ण असून 1 हजार 533 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 641 आहे. कोरोनाबाधित एकूण 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 116 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यातील 124 कोरोना बाधित रुग्ण असून 39 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 83 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 308 कोरोनाबाधित रुग्ण असून 87 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 200 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 41 कोरोना बाधित रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 24 कोरोनाबाधित रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.