अंबाजोगाईत ४० वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह  २५, २६,२७ नोव्हेंबर रोजी

तुषार अरुण गांधी,  कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अभिनेता किरण माने, कृषीभूषण विजय अण्णा बोराडे, दीप्ती नाखले, सचिन ईटकर यांची विशेष उपस्थिती व पद्मश्री पं. सतीश व्यास, पं. आदित्य कल्याणपूर, अर्शद अली खान व पूजा गायतोंडे यांच्या सांगीतिक सादरीकरणाने रंगणार समारोह

अंबाजोगाईः यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे यावर्षी ४० वे वर्ष असून चार दशकपूर्ती तीन दिवसीय कार्यक्रमात उद्घाटन समारंभ, कवी संमेलन, चित्रकला स्पर्धा,  बालआनंद मेळावा, कृषी परिषद, सुफी व गजल गायन  शास्त्रीय संगीत सभा,   यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार वितरण, समारोप समारंभ संपन्न होणार आहे.

अंबाजोगाईत गेल्या ३९ वर्षांपासून सातत्याने यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने वैविध्यपुर्ण, वैचारिक, वाङ्मयीन, सांगितीक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार, कृषिविषयक प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन तसेच ग्रंथ प्रदर्शन असे विविध कार्यकम आयोजित केले जातात. अंबाजोगाई व मराठवाड्याचा सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, वैचारिक वारसा जोपासण्याचा व दृढ करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर्षी ४० वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह दि.२५, २६ व २७ नोव्हेंबर २०२४ सोमवार, मंगळवार व बुधवार रोजी  संपन्न होणार आहे अशी माहिती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली.

उद्घाटन व कवी संमेलन

सोमवार, दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वा. या समारोहाचे उद्घाटन  प्रख्यात गांधीवादी विचारवंत व महात्मा गांधी यांचे पणतू तुषार अरुण गांधी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून सुप्रसिद्ध अभिनेते व सिनेमा,  मालिका  निर्माते किरण माने हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.

रात्रौ ८.३० वा. कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी ठाणे येथील ज्येष्ठ कवियत्री डॉ. प्रज्ञा दया पवार  ह्या राहणार असून, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अकोला  येथील सुप्रसिद्ध कवी गझलकार  गोपाळ मापारी हे करणार आहेत. तर सुप्रसिध्द कवी डॉ. वृषाली किन्हाळकर – नांदेड,  प्रा. सिसिलिया कार्व्हालो – वसई, संगिता बर्वे – पुणे, संजय चौधरी – नाशिक, बालाजी मदन इंगळे- उमरगा, रमजान मुल्ला- सांगली, जयंत चावरे – यवतमाळ, पूजा भडांगे – बेळगाव, सुनिती लिमये – पुणे, बालाजी सुतार – वर्धा (अंबाजोगाई), नारायण पुरी-  छ्त्रपती संभाजीनगर, नितीन वरणकार – शेगांव व संजय आघाव – परळी यांचा सहभाग राहणार आहे.

चित्रकला स्पर्धा व बाल आनंद मेळावा

मंगळवार, दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहेत.  सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून मुलांच्या आत्मबळ निर्माण करणारे राजेंद्र बहाळकर पुणे हे अध्यक्ष असतील तर   यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळ सराफ व आनंदवन वरोरा येथील धान्य रांगोळीकार चित्रकार प्रल्हाद ठक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व शालेय चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना परितोषिके प्रदान करतील. रांगभरण शालेय चित्रकला स्पर्धा त्या त्या शाळेत घेतल्या जात आहेत. तर ऐच्छिक विषय दिलेल्या ८ वी ते १० वी विद्यार्थ्याचे स्पर्धा कार्यक्रम स्थळी होतील.  सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल व दोन्ही गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय व उतेजनार्थ विजेत्यांना रोख बक्षीस पाहुण्यांच्या हस्ते दिले जातील.
सायं. ८ वा. सुगम संगीताचे आयोजन केले आहे. मुंबई येथील सुप्रसिद्ध सुफी व गझल गायिका  पूजा गायतोंडे यांचा मराठी, उर्दू, हिंदी गझल गायनाचा  *रंगरेझा* हा संगीतबद्ध सादर करतील.    साथसंगत – कीबोर्ड – मनोज राऊत,  तबला – शंतनु मायी,  ढोलक साथ योगेश ईंदोरिया यांचीअसेल.

शेतकरी परिषद

२७ नोव्हेबर बुधवार वार रोजी सकाळी १०.३० वा. शेतकरी परिषदेचे आयोजन केले असून प्रयोगशील शेतकरी व प्रसिद्ध कृषी कार्यकर्ते तथा मराठवाडा शेती सहाय्य मंडळ खरपुडी – जालना येथील कृषिभूषण विजय अण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी परिषद होणार असून ते “माझी शेती  कार्य कांहीं अनुंभव” या विषयावर मार्गदर्शन करतील तर  कृषी महाविद्यालय धाराशिव येथील माजी सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. मोहनराव बी. पाटील – छ्त्रपती संभाजीनगर हे “फळबाग पीक – लागवड पद्धती, संवर्धन व बाजारपेठ’  या विषयावर मार्गदर्शन करतील तर आवाड  शिरपूर ता. अंबाजोगाई येथील ऊस उत्पादक व अभ्यासक पांडुरंग आवाड  हे  “ऊस लागवड – स्वअनुभव व शेतकऱ्याला झालेला फायदे”‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.

समारोप समारंभ व पुरस्कार वितरण

याच दिवशी सायंकाळी ५.३० वाजता समारोप समारंभ होत असून पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समारोप समारंभ संपन्न होणार असून  यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले व महारष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र कला साहित्य प्रसरिणी मंडळ पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होईल. याच  समारंभात मराठवाड्यातील कृषी, साहित्य, संगीत व युवा (युवा गौरव – साहित्य) या क्षेत्रातील चार गुणवंतांचा यशवंतराव  चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देण्यातज येणार असून त्यात  जालना येथील प्रयोगशील शेतकरी, शेतकर्‍यांचे मार्गदर्शक व  प्रेरणास्थान, कृषीभूषण विजयआण्णा बोराडे  यांना कृषी,  छ्त्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ लेखक, साकेत प्रकाशन संस्थेचे प्रकाशक  बाबा भांड यांना साहित्य, मूळ तेर ढोकीचे सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले पद्मश्री पं. सतीश व्यास यांना संगीत तर तुळजापूर येथील साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार प्राप्त देविदास सौदागर  यांना युवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप स्मृतीचिन्ह,रोख अकरा हजार रूपये, शाल, पुष्पहार असे आहे.

संगीत सभेत संतूर वादन व शास्त्रीय गायन

रात्रौ ठिक ८.३० वा. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत स्व. पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य पद्मश्री पं. सतीश व्यास यांचे संतूर वादन होईल होईल त्यांना तबल्यावर पं. आदित्य कल्याणपूर हे साथ करतील. त्यानंतर कोलकत्ता  येथील प्रतिभावान शास्त्रीय संगीत गायक  उस्ताद अर्शद अली खान  यांचे गायन होईल. त्यांना पुणे  येथील प्रसिद्ध तबलावादक प्रशांत पांडव व संवादिनीवर गंगाधर शिंदे  पुणे हे साथ करतील.  

कला दालन व ग्रंथ प्रदर्शन

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ग्रंथ प्रदर्शन व विक्री, चित्र व फोटो प्रदर्शन आयोजित केले आहे. अंबाजोगाई येथील हौशी छायाचीत्रकर डॉ. शुभदा लोहिया, प्रा. अभिजीत लोहिया, डॉ. अविनाश मुंडे, शंतनु सोमवंशी,  सुशांत सोमवंशी, मुन्ना सोमाणी व नीरज गौड यांच्या अंबाजोगाई परिसरातील पक्षी, फुलपाखरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन “विहंगम भोवताल” याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. अंबाजोगाई येथील ज्येष्ठ चित्रकार त्र्यंबक पोखरकर यांनी रंग न वापरता तनाच्या काड्यापासून तयार केलेल्या चित्रांचे प्रदर्शन, आनंदवन येथील कला शिक्षक प्रल्हाद ठक हे वेगवेगळ्या धान्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेची धान्य रांगोळी काढणार आहेत व स्वरक्तातून काढलेल्या देश पातळीवरील थोर स्वातंत्र्य सेनानी, राष्ट्रपुरुष, समाजसेवक यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येईल. तसेच यशवंत परिवारातील कला शिक्षकांचे चित्र प्रश्न भरवण्यात येईल. वेगवेगळे  ग्रंथ प्रकाशनांचे ग्रंथप्रदर्शन व विक्री उपलब्ध असणार आहे. हे सर्व प्रदर्शने तिन्ही दिवस रसिक व प्रेक्षकांना पाहता येतील.

कै.भगवानरावजी लोमटे यांच्या प्रेरणेने सुरु झालेल्या या समारोहाचे महाराष्ट्रभर कौतुक झालेले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहचलेल्या या समारोहास रसिक श्रोत्यांनी तिन्ही दिवस उपस्थित राहुन सहकार्य करावे व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य कमलाकर कांबळे, सहसचिव प्रा.सुधीर वैद्य, कोषाध्यक्ष सतिश लोमटे, सदस्य, प्राचार्य प्रकाश प्रयाग, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, प्रा.भगवान शिंदे, यांनी व इतर पदाधिकारी तसेच सल्लागार भगवानराव शिंदे बप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *