# राज्यात आज १२० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू; एकूण ४२,६०० जणांवर उपचार सुरू.

 

मुंबई:  राज्यात आज २२३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ३९० झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २७३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राज्यात ४७ शासकीय आणि ३८ खाजगी अशा एकूण ८५ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ३७ हजार १२४ नमुन्यांपैकी ८२ हजार ९६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७४१ खाटा उपलब्ध असून सध्या २९ हजार ०९८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात १२० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- ९० (मुंबई ५८, ठाणे १०, उल्हासनगर ६, वसई विरार १, भिवंडी ३, मीरा-भाईंदर ५, पालघर १), नाशिक- ७ (नाशिक ५, मालेगाव २), पुणे- १७ (पुणे १०, सातारा ५, सोलापूर २), औरंगाबाद-२ (औरंगाबाद मनपा २), अकोला-४ (अकोला मनपा २, अमरावती २).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७८ पुरुष तर ४२ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ५३ रुग्ण आहेत तर ४७ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २० जण ४० वर्षांखालील आहेत. या १२० रुग्णांपैकी ६९ जणांमध्ये (५७.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २९६९ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू ३ मे ते ३ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ९० मृत्यूंपैकी मुंबई ५३, मीरा भाईंदर – ५, भिवंडी -३, ठाणे -९, उल्हासनगर -६, नवी मुंबई -६, सातारा- २, वसई विरार -१, अमरावती -१, औरंगाबाद -१, मालेगाव- १, नाशिक -१, सोलापूर १ असे मृत्यू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *