# राज्यात आज सर्वाधिक ३२५४ नवीन रुग्णांची नोंद; १४९ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

 

मुंबई: राज्यात आज १८७९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५१७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ३२५४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४६ हजार ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ९३ हजार ७८४ नमुन्यांपैकी ९४ हजार ०४१ नमुने पॉझिटिव्ह (१५.८३ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६९ हजार १४५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७२७ खाटा उपलब्ध असून सध्या २७ हजार २२८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळनिहाय मृत्यू असे: ठाणे- १२२ (मुंबई ९७, ठाणे १५, नवी मुंबई ५, उल्हासनगर ३, वसई-विरार २), नाशिक- ५ (जळगाव ५), पुणे- १० (पुणे १०), औरंगाबाद-७ (औरंगाबाद ७), लातूर-१ (बीड १), अकोला -३ (अकोला २, अमरावती १), नागपूर-१ (गडचिरोली १).

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ९४ पुरुष तर ५५ महिला आहेत. आज नोंद झालेल्या १४९ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ८७ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहेत. या १४९ रुग्णांपैकी १०४ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३४३८ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ६६ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू १८ एप्रिल ते ६ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ८३ मृत्यूंपैकी मुंबई ५८, ठाणे -९, नवी मुंबई – ५, जळगाव – ४, उल्हासनगर -३, वसई विरार – २, अमरावती – १ आणि गडचिरोली १ असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *