औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 90 कोरोनाबाधित रुग्णांची आज शुक्रवारी सकाळी भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 468 झाले आहेत.
शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) एसआरपीएफ कॅम्प (72) जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01), ध्यान नगर, गारखेडा (01), एन-2 लघु वदन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01) आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद (01) येथील आहेत. यामध्ये 83 पुरूष आणि सात महिला रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.