औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात काल 99 रूग्ण आढळल्याने एकूण 477 कोरोनाबाधित रुग्ण झाले होते. पुन्हा रात्री उशिरा 30 वर्षीय करीम कॉलनी, रोशन गेट येथील महिला रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नव्या 100 रुग्णांची भर पडल्याने काल शुक्रवारी एकूण 478 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर आज शनिवारी सकाळी नव्याने 17 रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 495 झाल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले आहे.
आज वाढलेले शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) संजयनगर, मुकुंदवाडी (६), कटकट गेट (२), बाबर कॉलनी (४), आसेफीया कॉलनी (१), सिल्क मिल कॉलनी (१), रामनगर-मुकुंदवाडी (१), भवानीनगर, जुना मोंढा (२) या परिसरातील आहेत. यामध्ये सात पुरूष आणि 10 महिलांचा समावेश असल्याचेही रूग्णालयाने कळवले आहे.