मुंबई: राज्य शासनाने औरंगाबाद जिल्ह्यासाठी (2022-23) 500 कोटींचा वार्षिक योजना निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील वाढलेली शहरी लोकसंख्या तसेच मराठवाड्यातील व अन्य जिल्ह्यातील रुग्णांना शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या दर्जेदार शासकीय वैद्यकीय सेवांकडे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले होते. परिणामी जिल्ह्याचा वार्षिक योजना निधी 385 कोटींवरून 500 कोटी पर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेच्यावतीने आभार मानले.