जालना: जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी परिसरातील एक चाळीस वर्षीय महिलेचा अहवाल आज शुक्रवारी सायंकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे.
मुंबईतील दादर येथून ही महिला नुकतीच आपल्या काही नातेवाईकांसह जालन्यात परतली होती. गावात पोहचल्यानंतर या महिलेला तापेसह खोकल्याचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी तिला महिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बुधवारी जिल्हा रुग्णालयाने या महिलेसह 137 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमूने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील काही अहवाल काल गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त झाले होते. तर काही अहवाल प्रयोग शाळेकडे प्रलंबित होते. मुंबई येथून परतलेल्या या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्याची संख्या 52 वर पोहचली आहे.
मुंबई किंवा पुणे येथून आलेला असा उल्लेख टाळता आला तर बरे.कारण अशा प्रकारे एक नवी विषमता वाढत आहे.खेडी आणि शहरं असा नवा संघर्ष गावच्या वेशीवर उभा टाकलाय.गावातून आपुलकी हरवत चाललीय.करोना परवडला पण गावात रहायचं नको अशी विवशता अडचणीत सापडलेल्या शहरी लोकांमध्ये वाढत आहे.आपण नक्की विचार कराल.