पुणे: पुणे विभागातील 2 हजार 475 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 347 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 607 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 4 हजार 525 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 184 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 178 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधीत रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधित रूग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 245, सोलापूर जिल्ह्यात 18, कोल्हापूर जिल्ह्यात 53, सांगली जिल्ह्यात 7 व सातारा जिल्ह्यात 28 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 166 कोरोनाबाधित रुग्ण असून 76 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 87 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 461 कोरोनाबाधित रुग्ण असून 168 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 261 आहे. कोरोनाबाधित एकूण 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 59 कोरोनाबाधित रुग्ण असून 34 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 24 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 136 कोरोनाबाधित रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 60 हजार 90 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 49 हजार 259 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 10 हजार 882 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 43 हजार 812 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 5 हजार 347 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.