# मुंबईतील ४० जणांसह आज राज्यात ५४ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

 

मुंबई: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. आज १४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज बुधवारी दिली. दरम्यान, मुंबईतील ४० जणांसह आज राज्यात ५४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण बळींची संख्या ९७५ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ०३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर २५ हजार ९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ९७५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २, औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर२१ महिला आहेत.

आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *