औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील नूर कॉलनीतील दोन मुले, दोन महिला, एक पुरूष, चिकलठाणा एमआयडीसी, भीमनगर आणि संजय नगरातील प्रत्येकी एक पुरूष असे एकूण आठ कोरोनाबाधितांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) त्यांना आज सुटी देण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्या या आठ जणांमुळे आतापर्यंत 73 जण कोरोनामुक्त झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
महापालिकेच्या कोवीड केअर केंद्रांवरून 13 जण बरे झाल्याने त्यांना काल सुटी देण्यात आली. म्हणून कालपर्यंत एकूण 65 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. त्यात आज पुन्हा आठजण कोरोनामुक्त झाल्याने 73 जण कोरोनामुक्त झाले. तर आज औरंगाबाद शहरातील विविध भागातील 49 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोबाधितांची संख्या 557 झाली. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 32 पुरूष, 17 महिलांचा समावेश आहे.
शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या): राम नगर (19), सिल्क मिल कॉलनी (08), रोहिदास नगर (02), वसुंधरा कॉलनी, एन-7, सिडको (01), चंपा चौक (05), दत्त नगर (01), संजय नगर (01), अभय पुत्र कॉलनी, समता नगर (01), न्याय नगर, गल्ली नं.07 (05), असेफिया कॉलनी (01), बेगमपुरा (04), गुरूद्वाराजवळ, उस्मानपुरा (01) या परिसरातील कोरोनाबाधितांचा समावेश आहे.
मिनी घाटीत आज 37 जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. 46 जणांचा येणे बाकी आहे. सध्या मिनी घाटीमध्ये 89 कोरोनाबाधितांवर विशेष विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, असेही मिनी घाटी प्रशासनाने कळवलेले आहे.