पुणे विभागात आज 267 रूग्णांची वाढ; एकूण कोरोनाबाधित 5614.

 

पुणे: पुणे विभागातील 2 हजार 695 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 5 हजार 614 झाली आहे. ही संख्या काल 5347 एवढी होती. यामध्ये आज 267 रूग्णांची वाढ झाली आहे. दरम्यान, ॲक्टीव रुग्ण 2 हजार 639 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 201 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 4 हजार 717 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 363 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 114 आहे. कोरोनाबाधित एकूण 240 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 192 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. कालच्या बाधित रूग्णाच्या संख्येच्या तुलनेत बाधित रूग्णाच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 192, सोलापूर जिल्ह्यात 17, कोल्हापूर जिल्ह्यात 43, सांगली जिल्ह्यात 5 व सातारा जिल्ह्यात 15 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 181 कोरोनाबाधित रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 71 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 478 कोरोनाबाधित रुग्ण असून 175 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 270 आहे. कोरोनाबाधित एकूण 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 59 कोरोनाबाधित रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 20 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 179 कोरोनाबाधित रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 164 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 62 हजार 602 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 52 हजार 865 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 9 हजार 779 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 47 हजार 150 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 5 हजार 614 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 1 कोटी 25 लाख 14 हजार 145 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 5 कोटी 38 लाख 59 हजार 124 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 584 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे, असेही विभागीय आयुक्त श्री. म्हैसेकर यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *