औरंगाबाद: जिल्ह्यातील 25 रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 12151 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6690 बरे झाले, 423 जणांचा मृत्यू झाला. तर 5038 जणांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, गेल्या 24 तासात 6 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये घाटीत राम नगरातील 32 वर्षीय पुरूष, सिडको मुकुंदवाडीतील 55 वर्षीय पुरूष, विविध खासगी रुग्णालयांत सेव्हन हिल परिसरातील 56 वर्षीय पुरूष, पैठण गेट येथील 55 वर्षीय स्त्री, मित्र नगरातील 62 वर्षीय स्त्री, मिसरवाडीतील 40 वर्षीय स्त्री कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आज दुपारच्या टप्प्यात आढळलेले मनपा हद्दीतील रुग्ण:(20)- पोलीस कॉलनी, मिल कॉर्नर (2), टीव्ही सेंटर (1), कासलीवाल गार्डन, मुकुंदवाडी (1), मामा चौक (1), अशोक नगर, मयूर पार्क (1), एन बारा हडको (3), हर्सुल टी पॉइंट (1), एसआरपीएफ परिसर(10).
ग्रामीण भागातील रुग्ण:(5)- गंगापूर (1), पिशोर रोड, कन्नड (2), फुलंब्री (1), सिल्लोड(1).