# पुणे विभागात 6 हजारांवर कोरोनाबाधित; आजपर्यंत एकूण 295 रुग्णांचा मृत्यू.

 

पुणे: पुणे विभागातील 2 हजार 927 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 29 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 807 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 295 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 5 हजार 14 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 552 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 212 आहेत. कोरोनाबाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 190 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 297, सातारा जिल्ह्यात 20, सोलापूर जिल्ह्यात 46, सांगली जिल्ह्यात 3, कोल्हापूर जिल्ह्यात 49 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 201 कोरोनाबाधित रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 90 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 524 कोरोनाबाधित रुग्ण असून 218 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 269 आहे. कोरोनाबाधित एकूण 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 62 कोरोनाबाधित रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 228 कोरोना बाधित रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 213 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *