# औरंगाबादेत आज 61 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ; एकूण 619 रुग्ण संख्या.

 

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यातील विविध भागातील 61 कोरोनाबाधित रुग्णांची सकाळपासून वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण 619 कोरोनाबाधित रूग्ण झाल्याची माहिती मिनी घाटी प्रशासनाने दिली.

औरंगाबाद शहरातील कोरोना पॉझिटीव्ह (कंसात रुग्ण संख्या):
न्याय नगर (02), संजय नगर (01), एसआरपीएफ, सातारा परिसर (01), कोतवाल पुरा (01), एन-4 सिडको (01), सदानंद नगर, सातारा परिसर (08), बीड बायपास रोड (01), भवानी नगर, जुना मोंढा (03), पुंडलिक नगर, गल्ली क्र. सहा (01), दत्त नगर-कैलास नगर, लेन क्रमांक पाच (05), कैलास नगर (01), बायजीपुरा (01), राम नगर (22), किल्ले अर्क (08) आणि ग्रामीण भागातील सातारा गाव (01), गंगापूर तालुक्यातील फुलशिवरा (04) हा रुग्णांचा परिसर आहे. रुग्णांमध्ये 36 पुरूष आणि 25 महिलांचा समावेश असल्याचेही कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *