औरंगाबाद: औरंगाबाद शहरात सकाळी 24 कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 651 झाली आहे. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 15 पुरूष आणि नऊ महिला रुग्णांचा समावेश असल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे.
शहरात नव्याने भर पडलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे: पुंडलिक नगर (02), सीडको एन सात (04), एन आठ (01), राम नगर (01), संजय नगर (05), प्रकाश नगर (01), चिकलठाणा (01), भडकल गेट (01), दत्त नगर (01), शहानूरमियाँ दर्गा (01), गांधी नगर (01), रोशन गेट (01), इतर (04) या परिसरातील आहेत, असेही प्रशासनाने सांगितले आहे.