# औरंगाबादेत 5 तासात आणखी 6 रुग्णांची वाढ; एकूण 829 कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात
पाच तासात सहा रूग्णांची वाढ झाली आहे. सकाळी 9 वाजता हा आकडा 823 होता. त्यात दुपारी दोनच्या सुमारास आणखी 6 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 829 झाली आहे. यामध्ये शहरातील हुसेन कॉलनीतील 3, चाऊस कॉलनीतील 2 व सिल्क मिल कॉलनीतील एका रूग्णाचा समावेश आहे.

औरंगाबाद शहरात आज 74 कोरोनाबाधितांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 823 झाली असल्याचे सकाळीच जिल्हा प्रशासनाने कळवले होते. त्यात पुन्हा दुपारी 6 रूग्णांची वाढ झाली आहे.

औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या):
सिडको एन सहा (2), बुढीलेन (1), रोशन गेट (1), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (7), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (6), हिमायत नगर (5), चाऊस कॉलनी (1), भवानी नगर (4), हुसेन कॉलनी (15), प्रकाश नगर (1), शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), रहेमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (5), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *