पुणे: पुणे विभागातील 4 हजार 423 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 हजार 981 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 147 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 7 हजार 200 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 3 हजार 848 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 37 आहे. कोरोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 460 ने वाढ झाली आहे, यामध्ये पुणे जिल्ह्यात 321, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 100, कोल्हापूर जिल्ह्यात 9 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 452 कोरोनाबाधित रुग्ण असून 134 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 301 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 795 कोरोनाबाधित रुग्ण असून 314 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 409 आहे. कोरोनाबाधित एकूण 72 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 98 रुग्ण असून 54 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 41 आहे. कोरोनाबाधित एकूण 3रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 436 कोरोनाबाधित रुग्ण असून 73 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 359 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 83 हजार 73 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 77 हजार 945 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 5 हजार 128 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 68 हजार 849 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 8 हजार 981 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.