औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 61 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 962 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज रविवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या) औरंगाबाद शहरातील जालान नगर (1), उलकानगरी (1), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (1), संजय नगर (1), सातारा परिसर (1), गणपती बाग, सातारा परिसर (6), विद्यानगर, सेव्हन हिल (1), एन सहा, सिडको (1), पुंडलिक नगर (5), हुसेन कॉलनी (9), राम नगर (3), बहादूरपुरा (8), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (1), कबाडीपुरा, बुड्डीलेन (3), शरिफ कॉलनी (3), बाबर कॉलनी (3), सिंधी कॉलनी (1), न्याय नगर (1), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (1), सिल्क मिल कॉलनी (1), घाटी (1), रेंटीपुरा (1), बायजीपुरा, गल्ली नं. 23 (1), जाधववाडी (1), मकसूद कॉलनी (1) अन्य (2), तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (2) या भागातील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 312 जण कोरोनामुक्त झाले आहेत, असेही कळवण्यात आलेले आहे.
आज तीनजणांचा उपचारादरम्यान मृत्यू:
घाटीत आज तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत घाटी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 28, मिनी घाटीमध्ये एक आणि खासगी रुग्णालयात दोन अशा एकूण 31 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या घाटीत 70 कोरोनाबाधित उपचार घेताहेत, ज्यामध्ये 64 रुग्णांची स्थिती सामान्य, सहा रुग्णांची स्थिती गंभीर आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये रोशन गेट येथील गल्ली नं. पाच येथील 42 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज (17 मे रोजी) मध्यरात्री 1.15 वाजता, शंभू नगर, गल्ली नं. 29 येथील 35 वर्षीय महिलेचा सकाळी सहा वा., बुड्डी लेन, रौफ कॉलनीतील 74 वर्षीय पुरूष रुग्णाचा उपचारास प्रतिसाद न मिळाल्याने सकाळी 9.15 वा. मृत्यू झाला आहे.