गेल्या 24 तासांत 81 हजार 533 रुग्ण झाले बरे; बरे होणारे देशातील 60% रुग्ण महाराष्ट्रासह 5 राज्यातील
नवी दिल्ली: सरकारचे लक्ष्यित धोरण आणि उपाययोजनांद्वारे भारतात सातत्याने कोविड-19 चे रुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत. भारताने आज पुन्हा एकदा एका दिवसात रुग्ण बरे होण्याचा नवीन उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक 81,533 रुग्ण बरे झाले आहेत. बरे होणारे देशातील 60% रुग्ण हे महाराष्ट्रासह तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि उत्तरप्रदेश या 5 राज्यातील आहेत. एकट्या महाराष्ट्रात 14,000 हून अधिक तर कर्नाटकात 12,000 हून अधिक रुग्ण एका दिवसात बरे झाले आहेत. एकूण 36 लाखांहून अधिक (3624196) रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्यचा दर 77.77% वर पोहोचला आहे.
गेल्या 24 तासांत देशात 97,570 नवीन सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. अतिरिक्त रुग्णांपैकी महाराष्ट्रात 24,000 हून अधिक रुग्ण आहेत. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात 9,000 हून अधिक रुग्ण आहेत. एकूण रुग्णांपैकी 60% रुग्ण हे केवळ पाच राज्यांमधील आहेत. गेल्या 24 तासांत या राज्यांमधील अधिकाधिक रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत 1,201 मृत्यूची नोंद झाली आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 442 मृत्यू महाराष्ट्रात तर कर्नाटकमध्ये 130 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. देशातील एकूण मृत्यूंपैकी 69% मृत्यू हे महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दिल्ली या पाच राज्यांमध्ये झाले आहेत.