सर्वपक्षीय राज्यसभा सदस्यांकडून नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 803 कोटींचा निधी वितरीत


निधी देणाऱ्यांमध्ये सचिन तेंडुलकर, पी. चिदंबरम, रामदास आठवले, छत्रपती संभाजी शाहू महाराज
आदी

नांदेड: सर्वसामान्य जनतेस राज्यात व देशात राज्यसभा सदस्य अर्थात खासदार कोण कोण कार्यरत आहेत त्याची नांवेही माहीत नसतात.त्याच बरोबर निधी देणा-या या राज्यसभा सदस्यानाही आपल्या नांवे कुठे कुठे निधी वितरित होतो व खरेच तो  विकास कामासाठी खर्च होतो की नाही याचाही त्यांना थांगपता व ज्ञान नसतो. सर्वपक्षीय एकूण 14 राज्यसभा सदस्यांकडून स्थानिक क्षेत्र विकासासाठी 2012-21 या दहा वर्षाच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी रू.803.03 कोटींचा निधी वितरित झाल्याची माहिती, माहितीच्या अधिकारात जिल्हा नियोजन मंडळाने अर्थात नांदेड जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून नुकतीच प्राप्त झाली आहे. ही माहिती माहिती अधिकाराचे अभ्यासक प्रा. डाॅ. एस.एस.जाधव यांनी दिली.
  
विशेष म्हणजे सुप्रसिध्द क्रिकेट पटू व भारतरत्न सचिन तेंडूलकरकडून रू. 19.80 कोटी तर सर्वाधिक निधी देणा-यामध्ये अविनास पांडे रू.147.41कोटी व राजीव शुक्ला रू.113.86 कोटीच्या निधीचा समावेश आहे.

एकूण 14 राज्यसभा सदस्यानी नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी दिल्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

1)खा.जनार्दन वाघमारे (लातूर) 2012-13 रू.90.25कोटी

2)खा.सचिन तेंडुलकर (मुंबई) 2014-15 रू.19.80 कोटी

3)खा.राजकूमार धूत (सेना, मुंबई) 2014-15 रू. 29.74कोटी

4)खा.हुसेन दलवाई (मुंबई) 2014-15 रू. 59.90 कोटी

5)खा.अनिल देसाई (मुंबई) 2014-15 रू.43.00 कोटी

6)खा. अविनाश पांडे (काँग्रेस, नागपूर)
   2016-17 रू.147.41 कोटी

7)खा.अमर साबळे (भाजप, मुंबई)
   2017-18 रू. 47.92 कोटी

8)संभाजी शाहू छत्रपती (सातारा)
2018-19 रू.49.50 कोटी

9)खा.पी.चिंदबरम (काँग्रेस, दिल्ली)
   2018-19रू.31.17

10)खा.विनय सहस्ञबुध्दे (मध्यप्रदेश, भाजपा) 2018-19रू.19.80कोटी

11)खा.रामदासआठवले (रिपाइं मुंबई)    2020-21रू.83.46कोटी.

12)खा.कुमार केतकर (मुंबई,पत्रकार)
     2019-21 रू. 25.70कोटी.

13)खा.विकास महात्मे (भाजपा, नागपूर) 2018-20 रू.19.80 कोटी.

14)खा.राजीव शूक्ला (काँग्रेस, दिल्ली) 2015-21) रू.113.86 कोटी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *