# कोरोनामुळे पोलिसाचा पहिला बळी; मुंबईतील हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबईः कोरोनाच्या संसर्गाविरुद्ध अहोरात्र झगडणाऱ्या पोलिस दलातील एका हेड कॉन्स्टेबलचा आज कोरोनाने पहिला बळी घेतला. मुंबईतील वाकोला पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत ५७ वर्षीय हेड कॉन्स्टेबलचा आज कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला. दरम्यान, कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील ९६ पोलिसांना  कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यात १५ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

एकीकडे मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चाललेला असताना नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबवाजणी करून घेण्यासाठी ठिकठिकाणी तैनात पोलिस खडा पहारा देत आहेत. त्या असंख्य कोरोना योद्ध्यापैकीच हे ५७ वर्षीय हेड कॉन्स्टेबलही एक कोरोना योद्धा होते. कोरोनाच्या संसर्गाने मृत्युमुखी पडलेले ते महाराष्ट्र पोलिस दलातील पहिलेच कर्मचारी आहेत. पोलिस महासंचालकांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या हेड कॉन्स्टेबलचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

या हेड कॉन्स्टेबलला २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील ९६ पोलिसांना  कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यात १५ पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *