नांदेड: महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग. दि. कुलथे अध्यक्ष विनाेद देसाई मुख्यालय सरचिटणीस सुदाम टाव्हरे संघटन सचिव रमेश जंजाळ हे सर्व पदाधिकारी १७ फेब्रुवारी रोजी नांदेड दौ-यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सकाळी १० वा जिल्हा परिषद कार्यालय येथे भेट, ११ वा. विविध शासकीय कार्यालयांना भेटी, सायं. ४-०० वा नियाेजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद, यानंतर सांय. ५.०० वा. शासकीय व निमशासकीय अधिकारी यांची बैठक संपन्न होईल.
या बैठकीत मुंबई येथील राजपत्रित अधिकारी कल्याण केंद्र बांधकाम, अधिका-यांना प्रशासनात काम करतांना येणा-या अडचणी, महागाई भत्ता, निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करणे, बक्षी समिती खंड २ ची स्वीकृती व अंमलबजावणी, नांदेड जिल्हा समन्वय समिती पुनर्गठन, ऐनवेळचे विषय यावर चर्चा हाेणार आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले महासंघाचे विभागीय सचिव निलकंठ पाचंगे राज्य संघटक रामचंद्र देठे, राज्य संघटक डॉ उत्तम इंगळे यांनी कळविले आहे. सर्व संबंधित अधिकारी यांनी काेविड-१९ चे पालन करून बैठकीस उपस्थिती दर्शवावी असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.