# लाॅकडाऊनमध्ये महाबळेश्वरला गेलेले वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात.

संग्रहित छायाचित्र

मुंबई:  सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपिल वाधवान या दोघांना रविवारी (दि.२६ रोजी) दुपारी साडेतीन वाजता सीबीआयच्या ताब्यात दिले. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर लोकांना होम कोरंटाइन केले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्रीअनिल देशमुख यांनी दिली.

गृहमंत्री देशमुख यांनीफेसबूक द्वारे संवाद साधताना हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, या कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते, त्याबाबत नेमलेल्या अपर मुख्य सचिव मनोज सौनिक चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून तो अहवाल रीतसर माझ्याकडे येईल आणि पुढे मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यावर योग्य तो निर्णय होईल.

या अहवालात अमिताभ गुप्ता यांनी स्वतः हे पत्र मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले. त्यामुळे पत्र देण्याबद्दल त्यांच्यावर कोणाचाही दबाव नव्हता हे स्पष्ट झाले आहे तसेच हा चौकशी अहवाल लवकरच सार्वजनिक करण्यात येईल. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी कसलेही राजकारण न करता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *