सरासरी वेळेच्या चार दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे: अनुकूल स्थिती च्या परिणामामुळे यंदा 27 मे रोजीच मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. सरासरीपेक्षा चार दिवस अगोदरच मान्सून दाखल होणार असल्यामुळे यंदा या मान्सूनची पुढील वाटचाल सुकर होण्याची चिन्हे आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, केरळमध्ये दरवर्षी 30 मे अथवा 1 जूनच्या आसपास मान्सून दाखल होत असतो.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या बुलेटिन मध्ये म्हटले आहे की, दक्षिण अंदमान तसेच बंगालच्या उपसागरातील उत्तर पश्चिम भागात मान्सूनला आगेकूच करण्यासाठी योग्य स्थिती तयार झाली आहे. त्यातच या बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यांची निर्मिती मान्सूनला पुढे नेण्यासाठी अनकूल आहे. त्यामुळे सरासरी 22 मेच्या आसपास अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होणारा मान्सून यंदा 15 मे रोजीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यातच आता अनुकूल स्थितीमुळे मान्सून केरळमध्ये निश्चितपणे 27 मे पर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
केरळमध्ये मान्सून दाखल झालेल्या तारखा व अंदाज:
वर्ष–दाखल झालेली तारीख– वर्तविलेला अंदाज तारीख
2017— 30 मे——- 30 मे
2018—29 मे—— 29 मे
2019— 8 जून — 6 जून
2020—- 1 जून —- 5 जून
2021— 3 जून —-31 मे