नांदेड, उस्मानाबादसह राज्याच्या काही भागात मुसळधारेचा इशारा

पुणे: बंगालच्या उपसागरातील मध्यपूर्व भागापासून वेगाने आगेकूच करीत असलेला मान्सून अनुकूल परिस्थितीमुळे दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, उस्मानाबादसह राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत शुक्रवार, 20 रोजी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल स्थिती झाल्याने मध्यपूर्व बंगालच्या उपसारातून नैऋत्य मोसमी वार्‍याने वेगाने दक्षिण अरबी समुद्राच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. शनिवार, 21 मे रोजी मान्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात दाखल होईल. बंगालच्या उपसारातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे मेघालय, कर्नाटक, केरळ, रॉयलसीमा, अंदमान, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, या भागात जोरदार पाऊस बरसत आहे. तसेच अफगाणिस्तानात पश्चिमी चक्रावात सक्रीय झाल्याने जम्मू काश्मीर हिमालयाच्या पायथ्याशी पाऊस सुरू झाला आहे. मात्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात या भागात 20 मे पर्यंत तीव्र उष्णतेची लाट राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *