आता १५ मिनीट अगोदरच कळणार वीज कोठे पडणार!

डाऊनलोड करा ‘दामिनी’ ॲप अन् आकाशातील विजेपासून करा संरक्षण आपले अन् इतरांचे

पुणे: मान्सून कालावधीत विशेषत: जून व जुलै या महिन्यात वीज पडण्याचे प्रमाण लक्षात घेता जीवितहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालयाने तयार केलेले “दामिनी ” ॲप वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते.

सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहायक, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, कृषिसेवक, कोतवाल, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत संगणक परिचालक आणि नागरिकांना ॲपचा वापर करावा.

“दामिनी” ॲप गुगल प्लेस्टोअरवर
https://play.google.com/store/apps/details?id=com.lightening.live.damini 
या लिंकवरुन डाऊनलोड करता येईल. या ॲपमध्ये जीपीएस स्थळाद्वारे वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी स्थिती दर्शविण्यात येते. ॲपमध्ये आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडण्याची सूचना प्राप्त होताच त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे. यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्राप्त सुचनेनुसार गावातील नागरिकांना पूर्वसूचना द्यावी आणि होणारी जीवितहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *