पुढील आठवड्यात महाराष्ट्रात येण्याची शक्यता!
पुणे: मान्सून केरळमध्ये कधी येईल याची गेल्या पंधरा दिवसापासून सर्वच वाट पाहत आहेत अखेर आज रविवार, २९मे रोजी नियोजित वेळेपेक्षा ३दिवस आधीच अरबी समुद्रात येऊन केरळ किनारपट्टी गाठली आहे. तो महाराष्ट्रात पुढील आठवड्यात म्हणजे ५ जून पर्यंत येण्याची शक्यता आहे.
मान्सून यावर्षी 16 मे रोजी अंदमानात दाखल झाला. त्यामुळे 27 मे पर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र, मान्सूनचा प्रवास मंदावल्याने त्याचा अंदाज येत नव्हता. अखेर केरळमध्ये तो आज सकाळी दाखल झाला त्यामुळे महाराष्ट्रात तो 5 जून पर्यंत येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले. महाराष्ट्रात सरासरी उणे 69 टक्के इतका कमी अवकाळी पाऊस या कालावधीत झाला. दरम्यान, अरबी समुद्राकडून मान्सूनचे वारे तळ कोकणाच्या दिशेने लवकरच वेगाने सुरू होऊन पाच जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.