पुण्याचा पाऊस आणि कमी पडलेली माध्यमे -विक्रांत पाटील

पुण्याच्या पावसाचे आणि भीषण वास्तवाचे नेमके वर्णन करण्यात आज तशी पुण्याची मुद्रित आणि मुख्य प्रवाहातील मानली जाणारी इतर माध्यमेही फारच कमी पडली. सोशल मीडियात पुण्याच्या पावसाच्या दाणादाणीच्या नेमक्या पोस्ट्सचा महापूर होता. सोशल मीडियाने पुण्याचा पाऊस जबरदस्त कव्हर केला. ट्विटर, फेसबुक, इन्स्टा, यू-ट्यूब ने नेमके आणि रिअल टाईम चित्र मांडले. राजकारण्यांना नेटकऱ्यांनी जबरदस्त धुतला. ‘मुंबई म्हणजे तुंबई’ असा टोला देणाऱ्यांना आज एका पावसानं झोडपलं…समुद्राची कमतरता होती ती पण आज पूर्ण झाली… बाकी बोटी तरी आता स्वत:च्या आणा… असा टोला मानसी पाटील हिने लगावला. पुण्यातली माध्यमे: पुणे तुंबविण्यास जबाबदार असणाऱ्या भ्रष्ट राजकारणी आणि विशेषत: वर, खाली, सर्वत्र असे ‘ट्रिपल इंजिन सरकार’ असलेल्या पालिकेतील सत्ताधारी BJP4Pune बाबत मुख्य प्रवाहातील माध्यमे फारच सॉफ्ट दिसली.

आधीच्यांहून अधिक भ्रष्ट राजकारणी, बेपर्वा सत्ताधीश, कर्तव्यभान हरवलेले निष्क्रिय व कुचकामी अधिकारी आणि बिल्डर लॉबी तसेच अतिक्रमणाने या शहराच्या पाणी निचरा व्यवस्थेचा गळा घोटला आहे. ‘तुम्ही पाण्याची वाट अडवली तर आता पाणी तुमच्या वाटेत येऊन तुमची वाट लावणारच!’

पुणेकरांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया पाहा:
• एकंदरीत मुंबईला पावसात पाणी साचत म्हणून टीका करणारे @BJP4Mumbai आणि त्यांचे ट्विटरसम्राट नेते @BhatkhalkarA, @ShelarAshish, @ChitraKWagh ताई आता @BJP4PuneCity ने समुद्रच पुण्यात आणला एक शब्द पण नाही या विकासावर, आता या विषयावर मुंबईत मत मागूच नका, दिसलं काम -तुषार

• मुंबई तुंबल्यावर गळा काढणारे नालाप्रेमी आता कुठल्या गटारात आहेत..पुणे तुंबल ना तिकडे कमळीच्यानो… -पराग

• आपला जातीय आणि धार्मिक भावनांवर विश्वास ठेऊन नेता निवडत रहा असेच धबधबे, नदी, समुद्र शहरात येतील, एवढ्या जवळून निसर्ग अनुभवायला मिळणे भाग्य लागते काही लोक वाईट बातम्या पसरवत आहेत त्या थांबवा,  शेवटी सकारात्मक विचार महत्वाचा
-चेतन देशमुख

• Kothrud, especially the Chandni Chowk area, lost a lot of hills in the name of development since 2017. Environmental clearances were distributed like chocolates to some big construction companies
PMC and the central environment ministry must answer -नितीन गोरे

• एका पावसात पुण्याचे हाल बघा. पुण्याला समुद्र नव्हता म्हणून BJP ने समुद्र मिळवून दिला. टीप = महापालिकेत BJP ची सत्ता होती. -ॲड. आनंद

• आज पुण्याचेच विसर्जन होण्याची वेळ आली. यंत्रणेने आता केवळ बघ्याची भूमिका न घेता DJ लावून, नाचून या शहराच्या विसर्जनाचा आनंद घ्यावा. -अनुराग बेंडे

• समुद्राला अनुभव करायचा म्हणून पुणे तुंबवुन समुद्राची मजा पुणेकरांना देणार्या भाजपाच्या ऑफिसात सुद्धा समुद्राचं पाणी पोहचले. होय पुण्यात सुद्धा समुद्र करून दाखवलाय. विकास सुद्धा तुंबून दाखवलाय.  -आनंद जंगम

• आदित्य ठाकरेंच्या प्रयत्नांमुळे यंदा मुंबई तुंबली नाही, पण पुणे तुंबलय, कुणाला द्यायचं बरं क्रेडिट? मनपा, सद्याचं सरकार, माविआ सरकार, आजी माजी पालकमंत्री वगैरे वगैरे…?
-मोहन केंगे

• सलग तासाच्या पावसामुळे स्मार्ट सिटी पुण्याचे तळ्यात रूपांतर झाले. काय @narendramodi जी काय 🔔 स्मार्ट सिटी केली तुम्ही! -बॅटमन

• पुणे शहरातल्या धानोरीच्या मुख्य रस्त्याची आजची ही अवस्था. पाऊस यायचा अवकाश.. शहरांच्या रस्त्यांवर नद्या-नाले वाहताहेत. शहर नियोजन नावाची गोष्ट वाहून गेलीय कधीचीच.. -सम्राट फडणीस

• देव, धर्मासाठी मतदान केलंय तर ट्रॅफिक जाम , पावसात रस्त्याचे ओढे- नदी होणे , प्रदुषण आणि बेकारी सारख्या क्षुल्लक गोष्टी कडे कानाडोळा करावा लागणारच. -झगडे अण्णा

• पुणेकरांना आतातरी कळलं असेल का मुंबईकरांचं दु:ख? -हर्षल जाधव

• पुण्याची मुंबई करून दाखवली की नाही.. पुण्याचा आजचा पाऊस आणि पुर.. विकास म्हणुन तो होत नाही त्यासाठी या सर्व गोष्टींचा ही विचार करावा लागतो नाहीं तर टक्केवारीत सगळं धुवून जातं.. -ॲड. सुनील कोरपडे

• हा ट्रिपल इंजिन सरकारचा विकास… चंपा, मोहोळ  कुठे आहेत… -आदित्य ठाकरे

• Not every heavy rain is a cloud burst. Please shut the fuck up! -मयूर वेदिक

• अजून करा शहरांचे क्रॉंक्रीटीकरण. – विशाल ठाकरे

• आज कोणी भक्त #PuneFloods वर memes नाही बनवणार का? -भगीरथ शेलार

परवा मुख्यमंत्र्यांनी पुण्यात बाप्पा दर्शन दौरा केला. त्याऐवजी राज्याचे प्रमुख म्हणून शिंदे-फडणवीस यांनी पुण्याच्या समस्या, अडचणी, कोंडी याची माहिती घेतली असती तर पुणेकरांना बाप्पा पावला असता. पुणे असे पाण्यात वाहून गेले नसते. मात्र, इथे आपल्या कर्तव्याचे भान उरलेय कुणाला?

पुण्याचा एकदम ओक्के कार्यक्रम केला सत्ताधाऱ्यांनी!
काय पाऊस
काय तुंबातुंबी
काय दाणादाण
एकदम ओक्केमध्ये झालं सारं..

मुख्यमंत्री पुण्यात बाप्पाचे दर्शन घ्यायला आले तेव्हाच मी हडपसर परिसरात थोड्या पावसाने रस्त्यावर कशा नद्या वाहू लागतात, ते सांगितले होते. हडपसर तर तुंबलेच पण कोथरुड, दिघी, विमाननगर, येरवडा, कोंढवा, कात्रज एव्हढेच काय तर स्वारगेट सारं सारं पुणे काल गटारगंगेत न्हाऊन निघाले. लाभार्थी आणि लाचार माध्यमे बोलणार नाहीत; पण हे सध्याचे अतिभ्रष्ट, बेपर्वा सत्ताधीश, मुजोर बिल्डर आणि नालायक अधिकारी तसेच शहराचा गळा घोटणारा अनियंत्रित विकास यांचे पाप आहे. पुणेकरा, आता तरी जागा हो, नाहीतर तुझा ओक्केमध्ये कार्यक्रम होतच राहील.
-विक्रांत पाटील
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत
मोबाईल: 8007006862
Vikrant@Journalist.Com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *