बॉम म्युझिक स्कुल हे शहराच्या सांगीतिक क्षेत्रातील नवे पाऊल

अंबाजोगाई: ओंकार रापतवार यांच्या बॉम म्युझिक स्कुलचे उद्घाटन हे शहराच्या सांगितिक क्षेत्रातील नवे पाऊल आहे असे मत ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांनी व्यक्त केले.

संगीत क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान मिळवून शहरातील संगीतप्रेमी मुलांना पिढीजात संगीत वाद्यांसह  उच्च तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसीत झालेल्या संगीत वाद्यांचे अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी ओंकार रापतवार यांनी सुरु केलेली बॉम म्युझिक स्कुल च्या उद्घाटन कार्यक्रमात नंदकिशोर मुंदडा बोलत होते. यावेळी मंचावर ओंकार रापतवार यांच्या आजी चंद्रकला रापतवार, जुन्या पिढीतील प्रख्यात गायीका सौ. राणी वडगावकर, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, ज्ञान प्रबोधिनी चे संचालक प्रसाद चिक्षे, प्रख्यात शल्य चिकित्सक डॉ. सिध्देश्वर बिराजदार, योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सचिव गणपत व्यास, निशाद अकादमीचे संचालक प्रकाश बोरगावकर, प्रख्यात गायक अभिजित जाधव, माजी उपनगराध्यक्ष मनोज लखेरा व इतर मान्यवर उपस्थित होते.

नंदकिशोर मुंदडा पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहराला जसा शैक्षणिक, सामाजिक वारसा इतिहास आहे तसा सांगीतिक इतिहास ही आहे. या शहरात राजा जैतपाल यांच्या राज्याच्या पूर्वीपासून सांगीतिक इतिहास असल्याचे सांगितले जाते. आता सांगीतिक क्षेत्रातील नव्या बदलानुसार नवनवीन अत्याधुनिक वाद्याने संगीत क्षेत्रात आपली जागा निश्चित केली आहे. या सर्व अत्याधुनिक संगीत वाद्यांचे शिक्षण देणारी म्युझिक स्कुल या शहरात व पंचक्रोशीत नव्हती यांची उणीव आता ओंकार रापतवार याने बॉम म्युझिक स्कुल च्या उद्घाटनाने दूर केली असल्याचे त्यांनी सांगितले.

बॉम म्युझिक स्कुल चे उद्घाटन ओंकार रापतवार यांच्या आई कल्पना रापतवार, आजी चंद्रकला रापतवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करतांना ओंकार रापतवार याने अंबाजोगाई शहर आणि परिसरातील मुलांना व संगीत प्रेमींना संगीत क्षेत्रातील पारंपरिक व अत्याधुनिक सर्व वाद्यांचे आणि गायनाचे अद्ययावत शिक्षण देण्याचा प्रयत्न या बॉम म्युझिक स्कुल च्या माध्यमातून करण्यात येईल. हे शिक्षण घेण्यासाठी वयाची कसलिही अट राहणार नाही. संगीतातील सर्व प्रकारची वांद्रे आणि गायनाचे शिक्षण देणारी ही बीड जिल्ह्यातील एकमेव म्युझिक स्कुल असेल असे सांगत शहरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना अद्ययावत शिक्षण देण्यासाठी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी केले तर आभार शिक्षक मैत्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय रापतवार यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. अनंत कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भिमाशंकर शिंदे व ओंकार रापतवार मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *