मुंबई: पदस्थापनेच्या प्रतिक्षेतील 8 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या आहेत. यामध्ये नांदेड विभागाच्या रिक्त असलेल्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी एस. एच. महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अन्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेली पदस्थापना खालीलप्रमाणे:
बिपीनकुमार सिंह यांची आर्थिक गुन्हे शाखेच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती.
प्रभात कुमार यांची उप महासमादेशक होमगार्डपदी नियुक्ती.
विनीत अग्रवाल यांची म्हाडाच्या अप्पर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारीपदी नियुक्ती.
राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथकेपदी नियुक्ती.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी जय जाधव यांची नियुक्ती.
कैसर खालिद यांची मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती.
डी. के. पाटील भुजबळ यांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती.
नांदेड विभागाच्या पोलीस उपमहानिरीक्षकपदी एस.एच. महावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.