छत्रपती संभाजीनगर: पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघ औरंगाबाद, रुतवा प्रकाशन आणि वितरण, कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालय औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले परिवर्तनवादी युवा साहित्य संमेलन रविवार, 19 मार्च रोजी कंचन शांतीलालजी देसरडा महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संशोधक आणि विचारवंत वंदना भिसे बनकर या आहेत, साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध विचारवंत शेषराव चव्हाण यांच्या हस्ते होणारआहे.
या साहित्य संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. गणी पटेल, एडवोकेट शिरीष कांबळे, सुदाम चिंचणे उपस्थित राहणार आहेत, नव्या पिढीतील तरुण लेखक प्राध्यापक डॉक्टर सुदाम राठोड, आणि ईश्वर हलगरे वाचकांशी संवाद साधणार आहेत, प्राध्यापक डॉक्टर संगीता घुगे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे. नव्या पिढीतील परिवर्तनवादी भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या लेखकांना विविध पुरस्कारांनी साहित्य संमेलनामध्ये सन्मानित करण्यात येणार आहे या साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक समाधान दहिवाळ यांनी केली आहे.