मुंबई: बॉलिवूडचा दमदार अभिनेता इरफान खान यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांना कॅन्सर या
आजाराने ग्रासले होते. उपचार सुरू असताना आज त्यांचे निधन झाले.
काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचं जयपूरमध्ये निधन झालं होतं. मात्र, लॉकडाऊन असल्याने इरफानला जयपूरला पोहोचणं शक्य झालं नाही. त्यानंतर इरफानची तब्येत बिघडण्यास सुरूवात झाली होती. मुंबईत असल्याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच इरफानने आईचं अंतिम दर्शन घेतलं होतं. दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. आज त्यांना कोलनचे इन्फेक्शन झाल्याचे समजले. आज 53 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे.
या बातमीने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. देशाने एक हरहुन्नरी अभिनेता आणि कलाकार गमावला आहे. कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आणि एक हिरा हरपला असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहेत.
इरफान यांचे गाजलेले चित्रपट:
पानसिंग तोमर, हिंदी मिडीयम, अंग्रेजी मिडीयम, लंच बाॅक्स, लाईफ ऑफ पाय, पिकू, कारवा, मदारी, तलवार, मकबूल, जज़्बा, स्लमडॉग मिलेनियर आदी.