नवी दिल्ली: भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोट मागे घेतली जाणार आहे.
नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या नोटा 30 सप्टेंबर पर्यंत बँकेत जमा कराव्यात किंवा बदलून घ्याव्यात. यापुढे 2000 रूपयाच्या नोटांची छपाई बंद केलाी जाणार आहे. बँकेत एका वेळी जास्तीत जास्त 20, 000 रूपयांच्या नोटा बदलून घेता येतील, असेही आरबीआय ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.