# औरंगाबादेतील सीटी चौक पोलिस ठाण्यातील दोन पीआयसह ४२ पोलिस कर्मचारी क्वारंटाईन.

 

संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल मंगळवारी १०५ असलेली संख्या आज १२८ वर गेली आहे. त्यामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील सीटी चौक पोलिस ठाण्यातील एका आरोपीचा अहवाल आज बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या पोलिस ठाण्यातील त्याच्या संपर्कात आलेल्या दोन पोलिस निरीक्षकांसह तब्बल ४२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

औरंगाबादेत काल मंगळवारी संध्याकाळपर्यंत पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १०५ होती. रात्री त्यात वाढ होऊन १०९ झाली. त्यात आज पुन्हा ११ जणांची भर पडल्याने ही संख्या १२० झाली आहे.  त्यानंतर आज दुपारी पुन्हा ८ जणांची भर पडल्याने ही संख्या १२८ वर गेली आहे. दरम्यान, सीटी चौक पोलिस ठाण्यातील आरोपीचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे पोलिस ठाण्यातील त्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या दोन पोलिस निरीक्षक, तीन पीएसआयसह एकूण ४२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मुंबईत मागील तीन दिवसांत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने पोलिस दल  हादरले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांना घरीच थांबण्याचे निर्देश दिले आहेत.  त्याअनुषंगाने आता औरंगाबाद येथील पोलिसांनीही अधिक सतर्क राहून काळजी घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *