जालना: जालना जिल्हा पोलीस दलातील दहा सहाय्यक फौजदारांना श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे सहाय्यक फौजदार रवी जोशी, घनसावंगी पोलीस ठाण्याचे शहाजी पाचरणे, हसनाबाद पोलीस ठाण्याचे राजू वाघमारे, सदर बाजार पोलिस ठाण्याचे संजय राऊत, चंदनझिरा पोलीस ठाण्यातील प्रवीणचंद्र कांबळे, पोलीस मुख्यालयातील दुर्गादास कौशल्य, मौजपुरी पोलीस ठाण्यातील शेख रशीद गफूर आणि पोलीस मुख्यालयातील प्रदीप घोरपडे यांचा समावेश आहे. या सर्वांना आहे त्या नेमणुकीच्या ठिकाणीच तात्काळ पदभार घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.