# लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांसाठी ‘श्रमिक’ विशेष रेल्वे सुरू; संबंधित राज्यांच्या विनंतीनुसार चालणार गाड्या.

 

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: गृह मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि अन्य व्यक्तींना त्यांच्या इच्छितस्थळी हलवण्यासाठी  ‘कामगार दिनापासून’ श्रमिक विशेष गाड्या सुरु करण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.

मानक प्रोटोकॉल्‍स अनुसारे अशा अडकलेल्या लोकांची ने-आण करण्यासाठी दोन्ही संबंधित राज्य सरकारांच्या विनंतीवरून या विशेष गाड्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालवण्यात येणार आहेत. रेल्वे आणि राज्‍य सरकारानी “श्रमिक विशेष’’ गाड्या सुरळीत चालवण्यासाठी आणि समन्वयासाठी वरिष्‍ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी असे यात म्हटले आहे.

प्रवासी पाठवणाऱ्या राज्यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी आणि ज्यांच्यामध्ये लक्षणे आढळणार नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जाईल. प्रवासी पाठवणाऱ्या राज्यांनी या लोकांना तुकड्या तुकड्यांमध्ये गाड्यांमध्ये बसवून नियोजित ठिकाणी पाठवताना सॅनिटाइज्ड बसचा वापर करावं तसेच सामाजिक अंतराचे निकष आणि अन्य सूचनांचे पालन करावे. प्रत्‍येक व्‍यक्तिसाठी मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच जिथून ते निघतील त्या रेल्वे स्थानकावर त्यांची भोजन आणि पाण्याची व्यवस्था तिथल्या राज्य सरकारने करायची आहे.

रेलवे प्रवाशांच्या सहकार्याने सामाजिक अंतराचे निकष आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न रेल्वे करेल. लांब पल्ल्याच्या मार्गावर प्रवासादरम्यान रेल्वेकडून जेवण पुरवले जाईल.  इच्छितस्थळी पोहचल्यावर राज्य सरकारकडून प्रवाशांना ताब्यात घेतले जाईल. त्यांची तपासणी, गरज भासल्यास विलगीकरण आणि रेल्वे स्थानकावरून पुढील प्रवासाची व्यवस्था केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *