# पुणे जिल्ह्यातून विस्थापित, कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतरांना गावी जाण्यासाठी ईमेल, संपर्क क्रमांकांसह नोडल अधिकारी नियुक्त.

 

पुणे: पुणे जिल्ह्यातून अन्य राज्यात अथवा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी http://covid19.mhpolice.in/   या लिंकवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांचे हद्दीतील अर्जावर संबंधित आयुक्तालयातील नोडल अधिकारी तथा पोलीस उपआयुक्त हे निर्णय घेतील. असा निर्णय घेताना मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी पोलीस उपआयुक्त, जिल्हाधिकारी, यांच्यामार्फत ते ज्या जिल्ह्यात अथवा राज्यात जाणार आहेत तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त करुन घेतील व त्यानंतरच पास देण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांचे प्रवासाकरीता आदेश निगर्मित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आल्याची तसेच याकरीता नोडल अधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील इतर जिल्ह्यात व इतर राज्यांमध्ये जाणार्या मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी संबंधित तहसीलदार करतील व ते ज्या जिल्ह्यांमध्ये जाणार असतील तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत घेतील. जोपर्यंत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांना ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय त्यांना पास दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांचे कोरोना विषाणूचे कोणतीही लक्षणे नसल्याबाबतचे प्रमाणपत्र घेवून लिंकवर अपलोड करणे अनिवार्य आहे. नागरिकांना लिंकवर माहिती भरण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यांनी ग्रामीण भागासाठी दूरध्वनी अथवा ई मेलद्वारे संपर्क साधावा. याकरीता नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे ( दूरध्वनी क्रमांक 020-26111061 / 26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार (परराज्यात, जिल्ह्यात जाणारे) , उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे ( दूरध्वनी क्रमांक 020-26111061/26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार (परराज्यात, जिल्ह्यात येणारे), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.26 निता सावंत-शिंदे ( दूरध्वनी क्रमांक 020-26111061/26123371) यांच्याकडे विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक (परराज्यात, जिल्ह्यात जाणारे), उपजिल्हाधिकारी, स्वागत शाखा, अमृत नाटेकर (दूरध्वनी क्रमांक 020-26111061/26123371) यांच्याकडे विद्यार्थी, यात्रेकरु, पर्यटक ( परराज्यात / जिल्ह्यात येणारे) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *