# राज्यात हमीभावानुसार कापूस खरेदी; 25 मार्चपर्यंत 91.90 लाख क्विंटल कापसाची खरेदी.

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्‍ली: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस विकतांना अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने सर्व शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे, की भारतीय कापूस महासंघ आणि राज्यातील कापूस उत्पादक पणन महासंघ हमीभावानुसार कापसाची खरेदी करायाला तयार असून राज्यात या हमीदराने कापसाची खरेदी केली जात आहे.

महाराष्ट्रात ऑक्टोबर 2019 पासून, हमीभावानुसार खरेदी सुरु आहे. 25 मार्च 2020 पर्यंत भारतीय कापूस महासंघाने 91.90 लाख क्विंटल म्हणजेच 18.66 लाख कापसाच्या गाठीची खरेदी केली आहे. राज्यातील 83 केंद्रांवरुन ही खरेदी करण्यात आली असून, या कापसाचे एकूण बाजारमूल्य 4995 कोटी रुपये एवढे आहे. महाराष्ट्रात उत्पादित झालेल्या एकूण कापसापैकी २५ मार्च २०२० पर्यंत 77.40 % कापसाची खरेदी CCI आणि खासगी व्यापाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अद्याप 22.60 % कापूस बाजारात आला नाही.

या कापसापैकी सुमारे 40 ते 50 % कापूस, ज्याची किंमत सुमारे 2100 कोटी असेल तो फडदर दर्जाचा असण्याची शक्यता आहे. या कापसाला चांगला बाजारभाव मिळाला नाही, तर त्याची हमीभावानुसार खरेदी व्हावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षाआहे. राज्यात हमीभावानुसार खरेदी सुरु असून 34 केंद्रातून सीसीआयमार्फत कापसाची खरेदी सुरु आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या काळात 36,500 क्विंटल म्हणजेच  6900 गाठी कापसाचे उत्पादन झाले आहे.

राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे या खरेदीवर नियंत्रण ठेवले जाते. सध्या कापसाच्या एकूण केंद्रांपैकी 27 केंद्र रेड झोनमध्ये येत असून, या ठिकाणी 3 मे 2020 नंतर खरेदी प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. उरलेल्या 22 केंद्रांवर सीसीआयने राज्य सरकारशी संपर्क साधला असून शेतकऱ्यांना कापूस देण्याची मागणी केली आहे. या खरेदीकडे वस्त्रोद्योग मंत्रालय दैनंदिन देखरेख ठेवून आहे.  या खरेदीत येणारे अडथळे दूर करण्यासाठी, सीसीआय राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, सातत्याने बैठका घेऊन अडचणी सोडवल्या जात आहेत. ही खरेदी प्रक्रिया सुरळीत व्हावी, यासाठी योग्य व्यवस्था करण्याबाबत वस्त्रोद्योग मंत्रालयाने एपीएमसी बाजारालाही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

खरेदी झालेल्या कापसाचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी, सीसीआय आवश्यक ती पावले उचलत आहे. एकूण खरेदी  केलेल्या 4995 कोटी रुपयांपैकी 4987 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *