# राज्यातील एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री दुकानांपैकी ३,९४१ दुकाने सुरू.

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई: राज्य शासनाने ३ मे २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. या मार्गदर्शक तत्वांना अनुसरुन राज्यातील ३३ जिल्ह्यात (३ कोरडे जिल्हे वगळता गडचिरोली, वर्धा व चंद्रपूर) काही जिल्ह्यांमध्ये सशर्त अनुज्ञप्ती सुरू आहे तर काही जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री बंद आहे. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण १०,७९१ किरकोळ मद्य विक्री दुकानांपैकी (अनुज्ञप्ती) ३,९४१ दुकाने (अनुज्ञप्ती) सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु असलेल्या जिल्ह्यांची नावे :- 1. ठाणे, 2. पालघर, 3. रायगड, 4. पुणे, 5. सोलापूर 6. अहमदनगर, 7. कोल्हापूर, 8. सांगली, 9. सिंधुदुर्ग, 10. रत्नागिरी, 11. नाशिक, 12. धुळे, 13. जळगाव, 14. नंदुरबार 15. गोंदिया, 16. अकोला, 17. वाशिम 18. बुलढाणा व 19. अमरावती.

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु न केलेल्या जिल्ह्यांची नावे :- 1. सातारा, 2. औरंगाबाद, 3. जालना, 4. बीड, 5. नांदेड, 6. परभणी, 7. हिंगोली, व 8. नागपूर,

किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु झाल्या होत्या परंतु पुन्हा अनुज्ञप्ती बंद करण्यात आल्या :- 1. मुंबई शहर, 2. मुंबई उपनगर, 3. उस्मानाबाद, 4. लातूर व 5. यवतमाळ.
किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरु होण्याची शक्यता असलेले जिल्हे :-. 1. भंडारा.

2.मद्यविक्री सुरु असलेल्या अनुज्ञप्तींची संख्या :-
अ.क्र.
तपशिल
एकूण अनुज्ञप्ती
चालू अनुज्ञप्ती

1)
CL – III (देशीमद्य किरकोळ विक्री अनुज्ञप्ती)
एकूण संख्या 4159
पैकी सुरू1574

2)
FL – II ( वाईन शॅाप )
एकूण संख्या 1685
पैकी सुरू 465

3)
FL BR – II( बीयर शॉप )
एकूण संख्या 4947
पैकी सुरू1902

एकूण 10,791
पैकी सुरू 3,941

राज्यात २४ मार्च, २०२० पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्वविभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असून १२ सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी/कर्मचारी तैनात आहे. काल 7 मे रोजी राज्यात ८० गुन्हे नोंदविण्यात आलेअसून 36 आरोपींना अटक करण्यात आली असून २२ लाख ३६ हजार रूपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २४ मार्च २०२०  पासून ७ मे २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण ४,९०९ गुन्हे नोंदविण्यात आले असून, २,१४० आरोपींना अटक करण्यात आली आहे.तर ४५४ वाहने जप्त करण्यात आली असून रु. १२.८५  कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *