# औरंगाबादेत 99 रुग्णांची वाढ; आतापर्यंत 477 कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 99 कोरोनाबाधित रुग्णांची आज शुक्रवारी भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित 477 झाले आहेत.

शहरातील कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या): एसआरपीएफ कॅम्प, सातारा परिसर (73), जयभीम नगर (04), बेगमपुरा (04), भीमनगर, भावसिंगपुरा (01), शाह बाजार (01), न्याय नगर, गारखेडा परिसर (01), लघु वेतन कॉलनी, मुकुंदवाडी (01), बायजीपुरा (03), कटकट गेट (01), सिकंदर पार्क (01), संजय नगर (07), कबीर नगर (01) या परिसरातील आहेत. तर ग्रामीण भागातील खुलताबाद येथील एक कोरोनाबाधित रुग्ण आहे. यामध्ये 88 पुरूष आणि 11 महिला रुग्णांचा समावेश आहे. या शिवाय आज 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या 142 रुग्ण मिनी घाटीत (जिल्हा सामान्य रुग्णालय) उपचार घेत असल्याचे या रुग्णालयाच्यावतीने सांगितले आहे.

घाटीमध्ये 35 रुग्णांवर उपचार सुरू:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज दुपारी चार वाजेपर्यंत एकूण 49 रुग्णांची स्क्रिनिंग झाली. त्यापैकी 24 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील एका रुग्णाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. 23 रुग्णांचा येणे बाकी आहे. घाटीच्या डेडिकेटेड कोविड रुग्णालयात एकूण 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 32 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. तीन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे 44 कोरोना निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण तीन कोरोना निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी दिल्याचे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.

औरंगाबादच्या रेल्वे स्टेशन परिसरातील 20 आणि 25 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णांना खाजगी रुग्णालयातून, बायजीपुऱ्यातील 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णास मनपा आरोग्य केंद्रातून घाटीत आज संदर्भीत केले आहे. कबीर नगरातील 37 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुष रुग्णास मिनी घाटीतून, रेल्वे स्टेशन परिसरातील 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णास मनपाच्या आरोग्य केंद्रातून घाटीत काल (दि. 7 मे) संदर्भीत केल्याचेही त्यांनी कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *