# औरंगाबादेत आज एका कोरोनाबाधिताचा मृत्यू, एकूण बळींची संख्या 13, सध्या 545 कोरोनाबाधित.

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीनमधील 50 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान आज रविवारी सकाळी 7.50 वा मृत्यू झाल्याचे औषधवैद्यक शास्त्राच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. दरम्यान, औरंगाबादेत आजपर्यंत एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शहरातील विविध भागातील 37 रुग्णांची आज नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 545 झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून 3 मे रोजी पहाटे चार वाजता पुढील उपचारासाठी घाटीत त्यांना संदर्भीत केले होते. मधुमेह, कीडनीचा आजारही त्यांना होता. मूत्रपिंडाचे काम कमी झाल्याने त्यांचे चार वेळा डायलिसिस केले. त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याने सहा मे रोजी रात्री आठ वाजता कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी व्हेंटिलेटर लावले. मागील दोन दिवसांपासून रक्तदाब कमी झाल्याने व न्युमोनिआ व मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत जिल्ह्यातील 65 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आजच्या 50 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णासह 13 जणांचा मृत्यू झाल्याचे मिनी घाटीच्यावतीने सांगण्यात आले आहे.

एकूण 545 रुग्ण कोरोनाबाधित:
औरंगाबाद शहरातील विविध भागातील 37 रुग्णांची आज नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 545 झाली. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 22 पुरूष, 15 महिला रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये (कंसात रुग्ण संख्या) राम नगर (19), सिल्क मिल कॉलनी (08), रोहिदास नगर (02), वसुंधरा कॉलनी, एन-7, सिडको (01), चंपा चौक (05), दत्त नगर (01), संजय नगर (01) या परिसराचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *