पुणे: पुणे विभागातील 1 हजार 237 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 953 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 115 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 926 बाधित रुग्ण असून 1 हजार 139 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 630 आहे. कोरोनाबाधित एकूण 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यातील 119 कोरोना बाधित रुग्ण असून 20 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 264 कोरोनाबाधित रुग्ण असून 41 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 38 कोरोनाबाधित रुग्ण असून 28 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 18 कोरोनाबाधित रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 34 हजार 64 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32 हजार 366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 1 हजार 671 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 28 हजार 969 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 3 हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
परप्रांतीय व्यक्तींसाठी रेल्वेची सुविधा:
सोमवार, 11 मे रोजी दु. 4.00 वा. पर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी – 4, उत्तरप्रदेशासाठी – 2, उत्तराखंडासाठी -1,
तमिळनाडूसाठी -1
अशा एकूण 8 रेल्वे रवाना झाल्या आहेत. तसेच सायं 5.00 वा.जबलपूर (म.प्र.) साठी व रात्री 10.00 वा. जयपूर (राजस्थान) साठी रेल्वेगाड्या रवाना झाल्या आहेत.