# राज्यात आज मुंबईतील २८ जणांसह ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू.

मुंबई:  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ४२७ झाली आहे. आज १०२६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ३३९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५१२५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंगळवारी दिली. दरम्यान, राज्यात आज मुंबईतील २८ जणांसह ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या आता ९२१ झाली आहे.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख २१ हजार ६४५ नमुन्यांपैकी १ लाख ९५ हजार ८०४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत तर २४ हजार ४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख ८१ हजार ६५५ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १५ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या आता ९२१ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील २८, पुण्यात ६, पनवेल ६, जळगावमध्ये ५, सोलापूर शहरात ३, ठाण्यात २, रायगडमध्ये १, औरंगाबाद शहरात १ आणि अकोला शहरात १ मृत्यू झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २९ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत, तर २७ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ५ जण ४० वर्षांखालील आहे. या ५३ रुग्णांपैकी ३५ जणांमध्ये (६६ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *