नांदेड: नांदेड शहरातील हॉटस्पॉट असलेल्या लंगरसाहिब येथे कोेरोनाचे नवीन दहा रुग्ण सापडल्याने दिवसभरात 11 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 63 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात आज मंगळवारी बारड येथील 22 वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तो मुंबईहून नांदेडला आला आहे. मागच्या आठ दिवसांमध्ये रुग्णांची संख्या स्थीर होती. मात्र, मंगळवारी रात्री आलेल्या अहवालामध्ये अचानकपणे नव्याने 10 रुग्णांची भर पडली असून, हे सर्व कोरोनाग्रस्त लंगरसाहिब येथील आहेत. दरम्यान, दोन मे रोजी एकाच वेळी 20 जण कोेरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. ते सर्वच्या सर्व लंगर साहिबमधील कर्मचारी होते. आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या लंगरसाहिब येथीलच आहे.